पिंपरीमध्ये नव्या कोरोनाचे आणखी ३ रुग्ण
महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव
मुंबई : कोरोना व्हायरसवर (Corona Virus) आता कुठे देशभरात लस येत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Corona Virus New Strain) रुग्ण देशभरात आढळत आहेत. महाराष्ट्रातही नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पिंपरीमध्ये नव्या कोरोनाचे आणखी ३ रुग्ण (New Corona Virus 3 patients found in Pimpari) आढळले आहेत. यावरून ब्रिटनमधील स्ट्रेनचे राज्यात आता ११ रुग्ण आहेत. ११ जणांपैकी प्रत्येकी एक जण गुजरात आणि गोव्यातील आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील ११ जणांना नव्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये मुंबईतील ५, तर पिंपरीत ३, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ११ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभाग आणि मनपा आयुक्तांशी चर्चा केलीय. तसंच अधिक खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.