अरुण मेहेत्रे, पुणे : पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनापुढे मोठं आव्हान असून नागरिकांच्या चिंताही वाढल्या आहेत. त्यातच आज पुणे महापालिकेने या दृष्टीकोनातून नवीन नियमावली जाहीर केली आहे. 


पुणे महापालिकेची नवी नियमावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर व्यायामासाठी मिळाली मुभा मिळाली असून सकाळी ५ ते ७ व्यायाम करता येणार आहे. लहाण मुलांसोबत मोठी व्यक्ती असणं गरजेचं असणार आहे. पण मैदानांवर गर्दी करता येणार नाही. व्यायामाची सामायिक उपकरण (ओपन जीम) वापरता येणार नाहीत.


- दुकाने पी-१ आणि पी-२ प्रमाणे सुरू ठेवावी लागणार आहेत. 


- खाजगी कार्यालय १५ टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील.


- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार आहेत. हॉकर्स व्यवसाय करता येणार आहे.


- पार्सल, कुरियर सेवा सुरु राहणार आहेत.


- घरमालकाची परवानगी असल्यास घरकाम करणारे, जेष्ठ रूग्ण मदतनीस येऊ शकतात. (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)


- लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांचीच मर्यादा असणार आहे.


- सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक असणार आहे.


- जेष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही. 


- रात्री ९ ते पहाटे ५ कुणालाही बाहेर पडता येणार नाही. 


- दुकाने आणि कार्यालयाची वेळा सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंतच असेल.