कोकण रेल्वे मार्गावर नवी गाडी, मनमाड ते सावंतवाडी
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी धावणार आहे. मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी धावणार आहे. मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.
०११९८ मनमाड - सावंतवाडी रोड अशी नवी गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी मनमाडवरुन ११ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्याकाळी १६ : १५ वाजता सुटेल ही गाडी सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल.
या गाडीला नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा देण्यात आलाय.
१२ स्लीपर कोच, एसेलआरचे दोन कोच असे एकूण १४ कोच असेल. या नव्या गाडीमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.