अनिरुद्ध दवाळे / अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हटलं की अनोखे आंदोलन, वेगवेगळे उपक्रम, रक्तदान शिबीर, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा एवढच काय तर वेळप्रसंगी एखाद्या न ऐकणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण करताना देखील राज्यमंत्री बचु कडू यांना अनेकांनी पाहीले आहे आणि आता त्याच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने बेलोरा हे गाव पाणीदार (water revolution) झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री बच्चू कडू. गावखेड्यातून आलेले लोकप्रतिनिधी सातत्याने बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या कार्यशैलीने चर्चेत राहतात. आता तर बच्चू यांनी त्यांच्या गावात केलेल्या जलसंधारणाच्या कामातून गाव पाणीदार झाले आहे. बेलोरा गावांतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच पण पाण्याची कमतरता असल्यामुळे बाराही महिने येथिल शेतकरी पीक घेऊ शकत नव्हते. बेलोरा गावातून पेढी नदी वाहते. या नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. पण पावसाळा संपला की नद कोरडी पडायची त्यामुळे गावातील विहीर, आणि बोरवेलला देखील फार पाणी नसायचे. परंतु आपले गाव पाणीदार करन्याचे बच्चू कडू यांनी ठरवले आणि ३६ लाख निधी खर्च करून या नदीचे रुंदीकरण करण्यात आले आणि खोलीकर करण्यात आले. याची फलश्रुती म्हणजे पहिल्याच पावसात नदी तुडूंब भरली आहे.


बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कामामुळे तबल शेकडो हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीवरील विहिरी आणि बोरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकरी आता उन्हाळ्यात देखील उन्हाळी पिके आणि रब्बी हंगामात देखील पिके घेऊन शकणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.



नदीतील पाणी अडवण्यासाठी अनेक गावांत बंधारे बांधले जातात. बेलोरा गावात बंधारा बांधला असता तर एक कोटी पर्यत खर्च आला असता. परंतु बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून नदीचे खोलोकरण व डोह खोदणे हे केवळ ३६ लाख रुपयांत झाले त्यामुळे वेळेची बचत आणि पैसेही वाचले.


बच्चू कडू यांच्या पुढाकाराने बेलोरा गावात नवीन जलक्रांती आता उदयास आली आहे. बच्चू कडून प्रमाणे इतर जिल्ह्यातही मंत्र्यांनी आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे जलसंधारणाचे काम केले तर राज्यात दुष्काळ संपण्यास मदत होईल.