नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे
फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
अनिल पाटील झी मीडिया गोवा : फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
देखण्या मंदिरांत भाविकांची वर्दळ वाढलीये.. चर्च विद्युत रोषणाईन न्हाऊन निघालेत.. सध्या पयर्टक या किनाऱ्यांचा मनमुराद आनंद घेताहेत.देशभरातला तापमानाचा पारा खाली गेला तरी गोव्यातला मात्र पारा २०-२२ अंशावरच असतो. त्यामुळे पर्यटक दिवसभर समुद्राचा मनमुराद आनंद घेताहेत. यासाठी पर्यटन खातेही विशेष प्रयत्न करते..
न्यू इयरचं सिलिब्रेशन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी इथले हॉटेल व्यवसायिक नेहमीच विशेष प्रयत्नात असतात.. हॉटेल्समध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.. यात लाईव्ह बॅंड, डान्स ,आतिषबाजी आदीचा समावेश आहे. सेलिब्रेशनची लज्जत अधिक वाढवण्यासाठी अनेक हॉटेलने आपले मेन्यू वाढवले आहेत .