वावर हाय तर पॉवर हाय! रुबाबात बैलगाडी हाकत वऱ्हाड घेऊन निघाला नवरदेव
Newly Wedding Couple Travelling In Bullock Cart: पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते काही खरं नाही. एका जोडप्याने चक्क बैलगाडीतीन लग्नाची वरात काढली आहे.
निलेश खरमारे, झी मीडिया,
Newly Wed Couple Choose To Use Bullock Cart: लग्न म्हटलं की हल्ली डोळ्यांसमोर मोठा स्टेज, सजावट, उंची पोशाख, डेस्टिनेशन वेंडिग, प्रीवेडिंग शूट असे नवीन ट्रेंड येतात. तर, हल्ली लग्नाच्या वरातीतही हटके प्रकार करण्याचा ट्रेंड निघाला आहे. लग्नाची वरात म्हटलं की चारचाकी गाडी किंवा सजवलेल्या घोडागाडीतून जाणारे वधू-वर (Bride And Groom) आपल्या डोळ्यांसमोर येतात. हल्ली हेलकॉप्टरमधून लग्नाची वरात नेण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. मात्र एक अनोखी वरात पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये काढण्यात आली आहे. एका विवाह सोहळ्यात चक्क शेतकऱ्यांच्या सर्जा-राजावरुन (bullock cart) वरात काढण्यात आली आहे. नवरदेवाने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे. (married couple on bullock cart)
नको घोडा नको गाडी...
नवरदेव आणि नववधू यांची महागडी गाडी आणि हेलिकॉप्टर, बुलेटची कोणतीही अपेक्षा न ठेवता आपली महाराष्ट्राची संस्कृती जोपासली आहे.
सजविलेल्या बैलगाडीतून कासरा हातात घेऊन, बैलगाडीचे सारथ्य करीत वधूला घेऊन शेतकरी नवरा लग्नस्थळी पोहोचला आहे. वऱ्हाड नेण्याचा हा पारंपारिक मार्ग निवडल्याने या लग्नसोहळ्याची जिल्ह्यात सगळीकडे चर्चा होतेय. लग्नस्थळी वधू-वरांच्या बैलगाडीसोबत अजूनही बैलगाड्या होत्या. अवास्तव खर्च टाळत नवरा-नवरीने साधेपणाने लग्न करतही आपली संस्कृती जोपासल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
लग्नस्थळी सजवलेली कार किंवा इतर वाहनांनी न जाता बदलत्या काळात लुप्त झालेल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निळुंज गावातील वर आकाश बनकर आणि वधू मेघा चौरे यांनी शेतकऱ्यांनी शान असलेल्या बैलगाडीतून लग्नमंडपात एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला.
बैलगाडीतून घेतली एन्ट्री
बनकर आणि चौरे कुटुंब हे शेतकरी आहे. त्यामुळं पारंपारिक पद्धतीने लग्नमंडपात बैलगाडीतून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतकऱ्यांच्या जीवनात असलेले बैलाचं महत्त्व पटवून देण्यासाठी बनकर आणि चौरे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. हे दोन्ही शेतकरी कुटुंब परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहेत. ग्रामीण भागातं बैलगाडीचा वाढता ट्रेंड, लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाड्यांनीही बैलगाडीला पसंती दिली आहे.
सर्जा-राजाला सजवले
वर-वधुसाठी असलेल्या बैलबंडीला छान सजवण्यात आलं होतं. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरली होती. गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगुरु लावण्यात आले होते. नवरदेव व नववधू देखील थाटात या बैलगाडीत बसले होते. ही आगळीवेगळी वरात पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली होती.