5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवर
राज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
NIA Raids: महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) ने संयुक्त कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही कारवाई करण्यात आली असून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना, मालेगाव आणि संभाजीनगर येथे पहाटे चार वाजल्यापासून एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. जालन्यातल्या गांधीनगर येथे एनआय अर्थात केंद्रीय दहशतवाद विरोध पथकानं कारवाई केली आहे. सकाळी चार वाजल्यापासून पथकानं ही कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव असून तो चामड्याचा व्यापारी असल्याचं कळतंय. सध्या परिसरात पोलिसांचे पथक तैनात असून पोलिसांची कारवाई सुरु आहे. तर किरपुडा भागातून मौलाना हाफिज याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
एटीएसचा काही तरुणांवर संशय होता. त्यादृष्टीने त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. या तरुणांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय एटीएसला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे मात्र, या कारवाईबाबत आणखी माहिती देण्यास एटीएसने टाळले आहे.
दरम्यान, एनआयए आणि एटीएसकडून महाराष्ट्रासह आणखी पाच राज्यांत कारवाई सुरू केली आहे. जवळपास 22 ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. दरम्यान, एनआयए आणि एटीएसकडून महाराष्ट्रासह आणखी पाच राज्यांत कारवाई सुरू केली आहे. जवळपास 22 ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. NIA ने उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात छापे टाकले आहेत. तर, काश्मीरमध्येही अन्य ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे,