मुंबई : नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी कोरोनाबाबतच्या एका बैठकीचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये बैठक सुरू असताना आदित्य ठाकरे मोबाईलमध्ये बघत असल्याचं दिसत आहे. यावरूनच निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना प्रोटोकॉल शिकवण्याची गरज असल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, याला कोणी protocol काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही. शेवटी बालिश बुद्धी आहे, हे परत सिद्ध करून दाखवलं.', असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. 



निलेश राणेंच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी आदित्य ठाकरेंच्या मोबाईलमध्ये बघण्याचं समर्थन केलं आहे, तर काहींनी आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. 'आदित्य ठाकरे आलेल्या मेसेजना रिप्लाय देत असतील. ते लोकांना तत्पर रिप्लाय देऊन काम सोडवतात. तुम्ही जे ट्विट करता त्याला बालिश बुद्धी म्हणतात', अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर कोरोना रोखण्यासाठी सरकारने काहीच उपाययोजना केल्या नसल्याची टीका एका यूजरने केली आहे. 




निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांवरही निशाणा साधला होता. लॉकडाऊनमध्ये साखर कारखान्यांच्या वाईट परिस्थितीबाबत पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. यावरूनच निलेश राणेंनी टीका केली होती. पण शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवारांच्या या प्रत्युत्तरावर निलेश राणे यांनी खालच्या शब्दात टीका केली. 


साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका