मुंबई :  प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून मुंब्रा, औरंगाबाद या ठिकाणहून ९ तरुणांना अटक करण्यात आली होते. हे ९ तरुण आयसीसस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची खळबळजनक बाब एटीएसकडून उघड करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हे तरुण आयसीसच्या संपर्कात होते, तर याच माध्यमातून त्यांनी एका मोठ्या नरसंहाराचा कट रचल्याची बाब सर्वांसमोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या या तरुणांची एटीएस कोठडी मंगळवारी संपल्यानंतर त्यांच्याविषयीची ही माहिती समोर आली. ज्यानंतर आता पुढील तपासणीसाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली. ज्यानंतर ही मागणी लक्षात घेताय न्यायालयाकडून या कोठडीत १५ फेब्रुवारीपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. 


अटक करण्यात आलेले हे तरुण इंटरनेटच्या माध्यमातून एक विषारी औषध तयार करत असून त्या रसायनाच्या माध्यमातून मोठा नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत ते होते. विषारी रसायनाच्या मदतीने पुणे, औरंगाबाद  आणि मुंबईमध्ये मंदिरांबाहेर देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याचा बेत या तरुणांनी आखल्याचं उघड झालं आहे. इंटरनेटच्याच माध्यमातून त्यांनी या विषारी रयासन तयार करण्याच्या प्रक्रिकेयचं प्रशिक्षण घेतलं होतं. 


अटक करण्यात आल्यापासू हे नऊ संशयित एटीएस कोठडीत होते. ज्यानंतर मंगळवारी त्यांची कोठडी संपली.. तरीही त्यांच्याकडून मिळालेली धक्कादायक माहिती आणि पुढील तपासाची मागणी करत एटीएसने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाकडून या मागणीचा स्वीकार करत १५ फेब्रुवारीपर्यंत हे नऊजण आता कोठ़डीतच असणार आहेत.