मुंबई : महाराष्‍ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर स्थित गुहांमध्ये निपाह व्हायरस आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महाबळेश्वरला महाराष्ट्रातील काश्मीर म्हटलं जातं. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. 2020 मध्ये पुण्याच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने महाबळेश्‍वरच्या गुहांमधून वटवागुळांची लाळीचे नमुने घेतले होते. ज्यामध्ये निपाह व्हायरस असल्याची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच निपाह व्हायरस मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील गुहा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. निपाह व्हायरसचं संक्रमण याआधी रोखण्याच यश आलं होतं. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाहमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला होता. निपाह व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाण ७५ टक्के आहे. सध्या यावर कोणतंही औषध उपलब्ध नाही. हा व्हायरस मुख्यत: वटवागुळामुळेच पसरतो. जेव्हा वटवागुळ एखादं फळ खातो तेव्हा त्याची लाळ त्या फळांवरच राहते. हे फळ जर इतर कोणत्याही प्राण्याने किंवा माणसाने खालं तर त्याला ही याची लागण होते.


जगात पहिल्यांदा या व्हायरसचा शोध मलेशियाच्या कम्पंग सुंगाई गावातून समोर आला होता. यामुळे या गावाच्या नावापुढे नंतर निपाह लागलं. हा व्हायरल मेंदुला हानी पोहोचवतो. यूएनचं म्हणणं होतं की, हा व्हायरस डुकरच्या माध्यमातून मनुष्यात पोहोचला होता. सिंगापूरमध्ये याचं पहिलं प्रकरण पुढे आलं होतं. निपाह व्हायरस हा डब्ल्यूएचओच्या पहिल्या 10 व्हायरसमध्ये येतो. भारतात 2001 आणि बांगलादेशमध्ये 2004 साली हा व्हायरस सापडला होता.


१९९८ मध्ये मलेशियामध्ये यामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ताप, उल्‍ट्या, बेशुद्ध होणे, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणं यामध्ये आढळतात. स्वच्छतेवर विशेष लक्ष देणं, खाण्याच्या बाबतीत लक्ष देणं, हात व्यवस्थित धुणे, दुषित गोष्टींना टाळणे, झाडावरुन पडलेली फळ न खाणे अशी काळजी घेतली पाहिजे.