रत्नागिरी : नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्याप्रमाणात लँड माफियांनी जमीनी खरेदी झाल्याचा पुरावा झी 24 तासाच्या हाती लागलाय. 


लँड माफियांचा सुळसुळाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर तालुक्यातील 14 गावांमध्ये हा प्रकल्प येणार याची कुणकूण लँड माफियांना आधीच लागली होती. आणि त्या अनुषंगानं हजारो एकर जमीन या लँड माफियांनी खरेदी करायला सुरूवात केली होती.


गुजराती माफियांची जमिन खरेदी


राजापूर, तारळ, साखर, कारशिगेवाडी, गोठीवर विल्ये, सागवे, आणि उपळे यागावांमध्ये जमिनी काही बड्या गुजराती भूखंड माफियांनी खरेदी केल्या आहेत. दरम्यान आमदार नितेश राणेंनी मात्र या जमीन खरेदीत शिवसेनेच्याच नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केलाय.