अमर काणे, झी २४ तास, नागपूर : मोदी सरकारमधील सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्याकरता ते विमानानं देशभर फिरतही असतात. मात्र, आपले व्यस्त कार्यक्रम आणि धावपळीतही ते आवर्जुन कुटुंबीयांना वेळ देतातच... त्याचाच प्रत्येय पुन्हा एकदा दिसून आला तो बुधवारी... नातवंडांना वेळ देता यावा याकरता गडकरी आजोबांनी त्यांच्यासोबत रेल्वेनं प्रवास केला. बुधवारी नितीन गडकरींनी पत्नी, दोन मुले-सुना आणि नातवंडासह नागपूर -  मुंबई असा प्रवास दुरांतोनं केला.


नितीन गडकरी आणि पत्नी कांचन गडकरी

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी साधेपणानं गडकरी कुटुंबानं दुरांतोनं प्रवास केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे जबाबदारी आणि निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे कुटुंबासह नातवडांना पुरेसा वेळ देवू शकले नाहीत. बुधवारी नितीन गडकरींची दोन्ही मुलं आणि सुना नातवंडांसह मुंबईहून दक्षिणेकडे फिरायला निघणार होते. त्याकरता त्यांनी नागपूर-मुंबई दुरांतोचं रिझर्व्हेशनही केलं होतं. मग काय नातवंडांना वेळ देता यावा आणि ट्रेनमधील गंमती-जमती सांगता यावा याकरता नितीन गडकरींनीही त्यांच्यासोबत दुरांतोनं मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.


नितीन गडकरींचा रेल्वे प्रवास

कुठलाही गाजावाजा न करता नितीन गडकरी दुरांतोच्या एच १ कोचमध्ये पत्नी कांचन गडकरी, पुत्र निखील, सारंग, दोन स्नुषा, नातवंड हे सर्वजण एच-१ कोचमध्ये बसले. दुरांतोनं हा कौटुंबिक दौरा करत असताना कुटुंबवत्सलपणाचा भावही गडकरींच्या चेहऱ्यावर दिसत होता... दरम्यान गडकरी दुरांतोनं जाणार म्हटल्यावर नागपूर रेल्वे स्थानावर रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली.