Nitin Gadkari Death Threat case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन बेळगावच्या जेलमधून आल्याचं उघड झाले आहे. धमकीचा फोन करणारा गुन्हेगार हा बेळगावच्या जेलमध्ये आहे. गडकरींना आलेल्या धमकीनंतर त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (Nitin Gadkari Threat Call Case News in Marathi) 


नियमबाह्य पद्धतीने गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी यांना फोनवरुन धमकी देणाऱ्याची ओळख पटली असून जयेश पुजारी असं त्याचं नाव आहे. तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेल्याचं समोर आले आहे. जेलमधून त्याने नियमबाह्य पद्धतीने फोन करुन गडकरींच्या कार्यालयात धमकी दिली. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश पुजारी आहे की आणखी कोणत्या टोळीचा हात आहे? आत दाऊदच्या नावाने धमकी दिल्याने अंडरवर्ल्डच्या अँगलनेही तपास सुरु आहे. सध्या नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. 


100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती?


नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गुन्हेगाराने केले असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. नागपुरातील खामला चौकातील कार्यालयात काल सकाळी 11.30  वाजता दोन कॉल आणि  12 वाजताच्या सुमारास एक कॉल करून दाऊद इब्राहिम याच्या नावानं धमकी देण्यात आली होती. तसेच 100 कोटी रुपयांची मागणी धमकी देणाऱ्याने केल्याचीही माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे.


 अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु


 आपण दाऊचा माणून आहे. 100 कोटी रुपये न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे ठार मारण्यात येईल अशी फोनवरुन धमकी देण्यात आली, असे सांगण्यात आले. जीव वाचवायचा असल्यास तत्काळ पैशांची व्यवस्था करावी, असे धमकी देताना धमकावले. बेळगावमधून मंत्री गडकरी यांना पैशाची मागणी करत खंडणीची धमकी दिली. तसेच बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्यामुळे या धमकी प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली असून अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु केला आहे.