मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातले अनेक जटिल प्रश्न सोडवले गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा खुलासा नितीन गडकरींनी नागपुरात केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातलं वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात अशी भाजपमध्ये चर्चा असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. नेतृत्व बदलायचं का नाही याचा निर्णय भाजपनं घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी सावज दमलंय हे विधान केलंय, त्याचा अर्थ तुम्हाला येत्या आठवड्याभरात कळेल, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. 


दरम्यान, मराठा आरक्षणाचा अहवाल रेंगाळण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या उपसमितीनं लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती मागासवर्गीय आयोगाला केलीय. मात्र आयोगानं यावर कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नसल्याचं समजतंय. आयोगाचं काम सुरू असल्याची माहिती अध्यक्षांनी यावेळी मंत्र्यांच्या उपसमितीला दिलीय. त्यांच्याकडे पाच एजन्सींचा अहवाल ३१ जुलैपर्यंत येणार आहे. त्यांच्याकडे १ लाख ८७ हजार निवेदनं आल्याची माहितीही आयोगानं दिली.  येत्या 14 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. मात्र या सुनावणीवेळी आयोगचा अहवाल न्यायालयात सादर होणे अवघड आहे. मात्र या बैठकीतून शिवसेना मंत्र्यांच्या डावलण्यात आलं.