Nitin Gadkari: ही निवडणुक व्यक्ती किंवा पक्षाचे भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही. आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारे निवडणूक आहे. देहु ते पंढरपुर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग 12 हजार कोटी रुपयाचा केला. लोकसंख्या आणि गाड्यांची संख्या वाढते त्यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी सुटत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 


शेतीचा विकास आणि रोजगार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतुककोंडी सोडविण्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करुन पुणे-औरंगाबाद महामार्गावर डबलडेकन फ्लायओहर बांधण्यांचा निर्णय घेतलाय. पुणे-नाशिक मार्गावर वाहतुककोंडीची समस्या आहे. नाशिक फाटा ते चांडोली या मार्गावर डबल डेकर मार्ग तयार करतोय. यासाठी 10 हजार कोटीचा खर्च आहे. जमिनीवर सहा पदरी रस्ता,वर फ्लायओहर,तीसरा मजला मेट्रो असा उपक्रम हाती घेतलाय. यातुन वाहतुककोंडी सुटणार असल्याचे गडकरी म्हणाले. तळेगाव चाकण शिक्रापुर या 54 किलोमीटर तीन मजली मार्ग मेट्रो असा प्लान तयार आहे .पुणे नगर मार्गावर शिरुर पर्यत वाहतुकमार्गावर वाहतुककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न आहे. शेतकरी मजुर कामगारांचे कल्याण व्हावे, शेतीवर व्यापार विकास होण्यासाठी वॉटर,पॉवर,ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पाहिजे यातुन शेतीचा विकास आणि रोजगारही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


इलेक्ट्रिक टँक्टर येणार


लवकरच इलेक्ट्रिक टँक्टर येणार आहे. आमच्या सरकारने इथेनॉल सुरु केली. इथेनॉल आणि इलेक्ट्रिक चारचाकी चालते. शेतकरी हा अन्नदाता न रहाता उर्जा दाता इंधन दाता,हायड्रोजन दाता व्हायला पाहिजे. गावखेडी संपन्न आणि समृद्ध व्हायला पाहिजे. देश भष्ट्राचारमुक्त होऊन विश्वगुरु व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. 


राम राज्य देशात आणण्याचा आमचा संकल्प


पश्चिम महाराष्ट्र गेल्या 60 वर्षात कामे झाली नाही त्यापेक्षा माझ्या विभानाने केल्याचे गडकरींनी अभिमानाने सांगितले. जे कॉग्रेसने 60 वर्षात केलं नाही ते आमच्या सरकारने 10 वर्षात करुन दाखवलं. संविधान बदलू शकत नाही. शिवाजी महाराजांची शिवशाही आमचा आदर्श आहे. प्रभू रामचंद्राचं राम राज्य आमचा आदर्श आहे. हेच देशात आणायचे हाच आमचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.


जातीपातीच्या राजकारणावर विश्वास ठेवू नका


मी सुद्धा लोकसभा निवडणूक लढतोय आणि लाखो मताने विजय होणार असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नागपुर माझा परिवार आहे. 'जो करेगा जात की बात उसको कसके मारेंगे लाथ'.. असे ते म्हणाले. मी जातीचे राजकारण कधी केलं नाही. ज्या लोकांना आपल्या कार्य कर्तुत्वावर विजय मिळवता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात. जातीपातीच्या राजकारणावर विश्वास ठेवु नका, असे ते म्हणाले.