नवी दिल्ली : कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार कोटांचा खर्च येणार असून एक हजार कोटी केंद्र आणि एक हजार कोटी महापालिका उभारणार आहे. ठाणे-भिवंडी बायपास रस्ता आठ पदरी करण्यात येणार असून त्याला एनएचएआयच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. 


सातारा - कोल्हापूर - कागल रस्ताही सहा पदरी करण्यात येणार आहे. तसंच जालना-चिखली रस्त्याचे चौपदरीकरणाचीही घोषणा गडकरींनी यावेळी केलीय. तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या कामांचा आढावा गडकरींनी घेतला.