नावाने मुस्लीम आणि धर्माने हिंदू; बालपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं?

Tabassum Birth Anniversary :  अवघ्या 4 वर्षांची असताना चित्रपटसृष्टीत तिचं आगमन झालं. ती पडद्यावरील छोटी मीना कुमारी आणि नर्गिस बनली होती. 21 वर्षीय भारतीय टेलिव्हिजनचा पहिला टॉक शो तिने होस्ट केला होता. 

| Jul 08, 2024, 11:50 AM IST
1/8

'छोटी नर्गिस' आणि 'छोटी मीना कुमारी' बनून बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात. त्यानंतर 21 वर्षे भारतीय टीव्हीचा पहिला टॉक शो होस्ट केला. एका लोकप्रिय मासिकाची ती संपादक होती. चित्रपटही तिने बनवले आणि एवढंच नाही तर त्या काळात यूट्यूबवर तिचं स्वतःच चॅनल होतं. ज्यामध्ये ती पूर्वीच्या दिवसांच्या सोनेरी आठवणी सांगायची. 

2/8

आम्ही बोलत आहेत तबस्सुम...ज्यांचं खरं नाव होतं किरण बाला. 9 जुलै 1944 मध्ये त्यांचा जन्म मुंबईत झाला. वडील हिंदू अयोध्यानाथ सचदेव आणि आई मुस्लिम असगरी बेगम. वडील हे स्वातंत्र्यसैनिक तर आई स्वातंत्र्यसैनिकासह लेखिका आणि पत्रकार होत्या. 

3/8

तबस्सुम यांनी एका मुलाखत सांगितलं होतं, तबस्सुम हे नाव वडिलांनी तर किरण बाला हे नाव आईने ठेवलं होतं. ऑन पेपर किरण बाला नाव आहे तर फिल्मी जगतात तबस्सुम. 

4/8

तबस्सुम या अतिशय आनंदी आणि हसणाऱ्या निरोगी व्यक्ती होत्या. पण वयाच्या 78 वर्षीय अभिनेत्री हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना आजही सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तर बेबी तबस्सुम नावाने त्यांनी कलाकार हाक मारायचे. 

5/8

फूल खिले है गुलशन गुलशन हा पहिला टॉक शोमुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. हा शो तब्बल 21 वर्ष ऑनएअर होता. तर तबस्सुम टॉकीज या यूट्यूज चॅनलवरील शोमध्ये त्या फिल्मी जगतातील अनेक किस्से सांगायची. सोशल मीडियावर हा शो खूप फेमस होता. एवढंच नाही तर इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी थ्रोबॅक फोटो शेअर करायच्या. 

6/8

तर 15 वर्ष त्या गृहलक्ष्मी या प्रसिद्ध मासिकाच्या संपादकपद त्यांनी भूषवलं. त्याशिवाय अनेक विनोदी पुस्तकंही त्यांनी लिहिलं आहेत. त्या खूप चांगल्या शायर होत्या. तर 1985 मध्ये तबस्सुम यांनी आपला पहिला सिनेमा 'तुम पर हम कुर्बान' दिग्दर्शित केला होत्या. त्यांनी स्वतः कथा लिहिली आणि निर्माताही त्याच होत्या. 

7/8

तबस्सुमने 'रामायण' मालिकेत रामची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल यांचे मोठे भाऊ विजय गोविल यांच्याशी लग्न केलंय. त्यांचा मुलगा होशांग गोविल यानेही चित्रपटांमध्ये काम केलंय. होशंगची मुलगी खुशी म्हणजेच तबस्सुमची नात हिनेही 'हम फिर मिले ना मिले' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

8/8

ज्येष्ठ चित्रपट निर्माते बीआर चोप्रा अभिनेत्रीला आपली मुलगी मानायचे. अभिनेत्री आलिशान आयुष्य जगली आहे. त्यांच्या संपत्तीबद्दल मीडियारिपोर्टनुसार बोलायचं झालं तर संपत्ती 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.