नागपूर : Cricket News : नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा (MP Sports Festival in Nagpur) समारोप कार्यक्रम खास ठरला. एरवी स्टेजवरून तुफान फटकेबाजी करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी  यांनी चक्क बॅटिंग करताना उत्तुंग षटकार खेचला. भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी टाकलेल्या बॉलिंगवर गडकरी यांनी तुफान फटके मारले. यशवंत स्टेडियमवर हा सामना रंगला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रद्द झालेला हा क्रीडा महोत्सव रंगला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी आणि कपिल देव मैदानात उतरल्यानंतर सामना चांगलाच रंगला. गडकरी हे बॅटिंग करण्यासाधी त्यांनी कपिल देव यांना बॉलिंग केली. गडकर यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी चेंडू फेकला आणि गडकरी बॉलिंग करण्यास सज्ज झाले आणि त्यांनी बॉल टाकला. या बॉलवर कपिल देव यांनीही चांगली फटकेबाजी केली. त्यांनीही जोरदार बॉल सीमापार केला. 



नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र डणवीस यांनी टाकलेल्या चेंडूवर भारताचे माजी कर्णधार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यशवंत स्टेडियमवर झालेल्या समारोपीय कर्यक्रमाल मोठ्या संख्यने क्रीडा प्रेमींनी हजेरी लावली. यावेळी प्रावीण्य प्राप्त खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.