मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे रिक्रूटमेंट २०१७ ने ११५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व नियुक्त्या स्टेशन कंट्रोलर, सेक्सन इंजिनिअर आणि ज्यूनिअर इंजिनिअर पदासाठी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हालाही मेट्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१७ आहे. 


या पदांसाठी नियुक्ती -


स्टेशन कंट्रोलर - ६२ पद(वेतन - १३,५०० ते २५,५२०)
सेक्शन इंजिनिअर - १० पदं (वेतन - १६,००० ते ३०,७७०)
ज्यूनिअर इंजिनिअर - ४३ पदं (वेतन - १३,५०० ते २५,५२०)


पात्रता -


स्ट्रेशन कंट्रोल पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिक-मेकॅनिकल-इलेक्ट्रॉनिकमधून तीन वर्षाचा इंजिनिअरींग डिप्लोमा केलेला असावा. सेक्सन इंजिनिअर पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल- मेकॅनिकल- इलेक्ट्रॉनिक्समधून चार वर्षांची इंजिनिअरींगची डिग्री केलेली असावी. तर ज्यूनिअर इंजिनिअर पदांसाठी इलेक्ट्रिकल- मेकॅनिकल- इलेक्ट्रॉनिक्स- इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्यूनिकेशन-सिव्हिलमधून तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.


वयाची अट -


अर्ज करणा-या उमेदवारांचं वय १ ऑक्टोबर २०१७ ला कमीत कमी १८ इतकं असावं आणि जास्तीत जास्त २८ वर्ष असावं. सर्व उमेदवारांची निवड मेडिकल टेस्टनंतर ऑनलाईन परीक्षा, मुलाखतीच्या आधारावर केलं जाईल. स्टेशन नियंत्रकासाठी सायको टेस्टही होईल.