अंबरनाथ :  अंबरनाथ, बदलापूरमधून मुंबईत कामाला जाणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना शहरांत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. केडीएमसी, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला असून 8 मेपासून अंबरनाथ, बदलापूर शहरांत ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत कामाला असणाऱ्यांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. या शहारांमधून अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्माचारी मुंबईत कामासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.



दरम्यान, मंगळवारी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांतही ये-जा करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं. या दोन्ही महापालिका क्षेत्रातून मुंबईत कामासाठी ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती महापालिकेला ऑनलाईन कळवावी अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे.