डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, पुणे : आपल्या हाँकिंग सिस्टीम आपल्या डेबिट कार्डशी जोडल्या असत्या तर आतापर्यंत आपण सर्व जण दिवाळखोर झालो असतो. आज अनेक शहरांमध्ये रस्त्यावरची वाहतूक ही ध्वनी प्रदुषणाचे सर्वात मोठे कारण असते आणि साधारणतः, वाहतुकीचे प्रमाण आणि वेग वाढला की आवाजाची पातळीही वाढत जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँकिंग ही कोणत्याही चालकाकडून सहजपणे होणारी कृती आहे. सरासरी विचार केला तर दिवसातून 5-10 वेळा हॉर्न वाजवला जातो. गेल्या वर्षी, सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणाऱ्या आघाडीच्या 10 शहरांमध्ये दोन भारतीय शहरांचा समावेश होता. दिल्ली हे शहर दुसऱ्या स्थानावर होते तर मुंबई चौथ्या स्थानावर. आणखी एका अभ्यासात असं समोर आलं की, पुणेकर दिवसातून 1 कोटी वेळा हॉर्न वाजवतात.


रस्त्यावरील अन्य व्यक्तीला सावध करणे आणि अपघात रोखणे, हे मुख्य उद्दिष्ट असलेला हॉर्न आता राष्ट्रीय संकट बनले आहे. तसे फारसे महत्त्वाचे नसलेले हे उपकरण लक्षणीय प्रमाणात ध्वनी प्रदूषण करत आहे. 
वातावरणात निर्माण होणाऱ्या आवाजामुळे आरोग्यावर विविध परिणाम होतात. त्यामध्ये इस्कॅमिक हार्ट डीसिज, झोपेत अडथळे, मुलांमध्ये कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, चीडचीड, तणावाशी संबंधित मानसिक आरोग्याचे धोके आणि टिनाटस यांचा समावेश आहे. इतकी गंभीर परिस्थिती असूनही, आवाज या प्रदूषण करणाऱ्या घटकाला कधीही पुरेसे महत्त्व दिले जात नाही. परंतु, सुदैवाने आता चित्र बदलू लागले आहे.


आवाजाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक वाहतूक कार्यालय (आरटीओ) आणि पुणे वाहतूक पोलीस विविध मार्ग शोधत आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे, 12 सप्टेंबरपासून, दर आठवड्याला 'नो हाँकिंग डे' सुरू करणे. 
लोकांमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी जगभरातील निरनिराळे देश उपाय शोधत आहेत. या उपायांमध्ये बंदी, कायद्याची अंमलबजावणी, रॅली, अभियान आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी योगदान देऊ शकेल असा प्रत्येक मार्ग यांचा समावेश आहे. 


परंतु, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे, लोकांनी स्वतःच स्वतःहून कृती करणे. सरकारने बंदी घालणे आणि दंड आकारणे, असे निर्बंध घातले तरी काही वेळा ते ज्या व्यक्तींसाठी घातले जातात त्यांना न पटल्यास हे पर्याय परिणामकारक ठरत नाहीत. यामुळेच प्रामुख्याने हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. सक्तीचे करण्याऐवजी, स्वेच्छेने 12 सप्टेंबर रोजी नो हाँकिंग डे पाळणे अपेक्षित आहे.


एक दिवस हा प्रयोग खरेच यशस्वी होईल आणि त्यानंतर शांत आणि सलोख्याच्या शहरात राहण्यासाठी लोक स्वतःहून हाँकिंग कमी करतील, अशी अपेक्षा आहे. हॉर्नची अजिबातच गरज भासणार नाही, अशा दिवसाची प्रतीक्षा आहे. 12 सप्टेंबरनंतर, तो दिवस लवकरच जवळ येईल, अशी अपेक्षा आहे.