`5 वी आणि 8 वीला नापास झालात तर..,` केंद्रीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
5th and 8th Standered Passing: पाचवी, आठवीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातील परीक्षा हलक्यात घेऊन चालणार नाही.
5th and 8th Standered Passing: पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे. नापास झाल्याने विद्यार्थी नैरश्यात जातात. यामुळे शालेय शिक्षणात नापास न करता पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता या नियमात बदल करण्यात आला आहे.
पाचवी, आठवीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातील परीक्षा हलक्यात घेऊन चालणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द केली आहे. इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी नापास होणार आहेत.
त्यातल्या त्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक दिलासा देण्यात आलाय. तो म्हणजे 2 महिन्यांत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु ते पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठवले जाणार नाही, असेही केंद्रीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
शाळा आठवीपर्यंत विद्यार्थ्याला बाहेर काढणार नाही. मुलांमधील शिक्षणाचा परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली आहे.