गोंदिया : ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला तरीही पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय. ही स्थिती एका तालुक्याची नसून संपूर्ण जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १५ दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने ४० टक्के शेतक-यांच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तर ६० टक्के शेतक-यांनी जुलै महिन्यातील पावसाने धान पिकाची रोवणी केलीय. मात्र सद्यस्थितीत शेतकरी दुबार पेरणीही करु शकत नसल्याने धान उत्पादक शेतक-यांवर आर्थिक संकट ओढावलंय.


जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिका-यांनी धान उत्पादक शेतक-यांच्या शेतावर जाऊन भेट दिली. १५ ऑगस्टपर्यंत पाऊस पडला नाही तर दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषीत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करु असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय.