नाशिक : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये ईद मिलादच्या जुलूसमध्ये नागरिकांनी संयम सोडला. ईद - मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभाग झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगांवमध्ये ईद मिलाद मिरवणुकीच्यावेळी प्रशासनाची बंदी झुगारुन हजारो मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. रमजान ईद आणि बकरी ईदला दाखविला संयम यावेळी नागरिकांनी संयम तोडल्याचे दिसून आले. मोठी गर्दी झाले होती. ही गर्दी पांगविताना पोलिसांची दमछाक झालेली पाहायला मिळाली.



कोरोना संसर्ग टाळण्यासाठी  प्रशासनाने अवघ्या १० जणांना मिरवणूक काढण्याची परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी झुगारत हजारो नागरिक या जुलूसमध्ये सहभाग झाले होते. विशेष म्हणजे जुलुसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे मास्क घातलेले नव्हते. ना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले होते. तसेच दुवा पाठणाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. 


कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांवात रमजान ईद आणि बकरी ईदला सार्वजनिक नमाज पठणाच्या वेळी शुकशुकाट होता. मात्र ईद मिलाद जुलूससाठी नागरिकांनी संयम सोडला आणि हजारोच्या संख्येने गर्दी पोलीस या नागरिकांवर काय कारवाई करते हे आता पाहावे लागेल. 


6\