पुणे : पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद असेल. कारण उन्हाळ्यात पुण्यात पाणीकपात होणार नाही. पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना, पुणे महापालिकेला दररोज 1350 एमएलडी पाणी उचलण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.  


पुणेकरांनो तरीही पाणी जपून वापरा


महापालिका सध्या 1650 एमएलडी पाणी उचलते. कालव्याने पाणी उचलायचो. पाईपलाईन चे काम पूर्ण नव्हते म्हणून 1650 एमएलडी पाणी उचलले जायचे. पण, आता पाईपलाईन मधून पाणी उचलणार असल्याने 1350 एमएलडी पाणी पुरणार असल्याचा महापालिकेने खुलासा केला आहे.