नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आज अविश्वास ठराव पास केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ करत पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ मतदान केलं. ५० विरूद्ध  २२ मतांनी हा अविश्वास ठराव पास झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल मनपा स्थापन होऊन दीड वर्षं झालं. सुधाकर शिंदे हे पहिल्यापासून मनपाचे आयुक्त आहेत. मात्र भाजप नगरसेवक आणि आयुक्तांमधून विस्तव जात नव्हता. आयक्त नागरी कामं करत नसल्याचा आक्षेप भाजपने घेतलाय. 


कचरा प्रश्न, पाणी, सार्वजनिक भूखंड, मैदाने या महत्त्वाच्या कामात आयुक्तांना अपयश येत असल्याचा भाजपचा आरोप आहे. शेकाप आघाडीच्या २२ नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात म्हणजेच आयुक्तांच्या बाजूने मतदान केलं. आता आयुक्तांच्या बदलीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.