`अंजली दमानिया यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट`
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे, अशी माहिती आरोप करण्यात आलेले आणि भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे दिली.
जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे, अशी माहिती आरोप करण्यात आलेले आणि भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे दिली.
प्रसिद्धीमाध्यमांकडे बिनबुडाचे आरोप
अंजली दमानिया यांनी आपल्याविरोधात न्यालयात पुरावे देण्याऐवजी केवळ प्रसिद्धीमाध्यमांकडे बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध कोर्टात त्यांच्याविरोधात २७ ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे बादमनामींचे खटले भरले आहेत, अशी माहिती माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात दिलीय.
'पक्षश्रेष्ठी निश्चित याची नोंद घेतील'
त्यातीलच एका खटल्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर कोर्टाने दमानिया यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. दरम्यान, चूक नसताना दमानिया यांनी आपल्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. पक्षश्रेष्ठी निश्चित याची नोंद घेतील, अशीही अपेक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केलीय.