वर्धा : ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठणगी वाहू दे....असे म्हणत भात्याने हवा घालत लोखंडाला आकार देणारा समाज आधुनिकतेकडे वळत असल्याचे वर्ध्यात पुढे आले आहे. रस्त्याच्या कडेला बसून भट्टीतील आग प्रखर करण्याकरिता भात्याला लागणारे श्रम वाचविण्याकरिता या कारागिरांने सोलर पॅनल आधार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोलर पॅनेलच्या ऊर्जेने टाळपणाऱ्या भट्टीतून ऐरणीच्या या देवाला जणू सुर्यतेजाचा प्रकाश' मिळल्यागत ज्याला भडकत आहेत. महात्मा गांधी यांनी ग्रामोद्योगाची कास धरून विकास साधण्याचा सल्ला दिला.त्याचा यास सल्ल्याची कास धरून विज्ञानाची जोड देत विकास मार्गावर चालणाऱ्या वर्ध्यातील सोळंकी लोहार या कारागिरांचे काम महात्मा गांधी यांची प्रयोगभूमी असलेल्या गांधी जिल्ह्याला साजेसे असेच आहे.



रस्त्यावर ऊन मिळेल अशा ठिकाणी सोलर पॅनेल ठेवून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालत असलेली ही भट्टी अनेकांकरिता आकर्षण ठरत आहे.येथे येणारे प्रत्येक व्यक्ती आग ओकणाऱ्या या भट्टीची माहिती घेतल्याशिवाय राहत नाही. पण नव्या तंत्रज्ञानामुळे लोहार काम करणाऱ्या व्यक्तीला थोडा आराम मिळणार आहे. भात्याने हवा खालताना लोहाराला प्रचंड त्रास होतो. एवढंच नाही तर या कामासाठी त्यांना भरपूर श्रम घ्यावे लागतात. पण आता सोलर पॅनलच्या मदतीने झाडांची तोड कमी होईल तसे लोहार काम करणाऱ्या व्यक्तीचे श्रम कमी होतील.