`तिनका-तिनका तिहाड़` आता मराठीत, येरवडा जेलमध्ये प्रकाशन
तिहार जेलच्या कैद्यांच्या लेखनातील सर्जनशीलतेवर आधारीत चर्चित पुस्तक `तिनका तिनका तिहाड` आता मराठीत प्रकाशित करण्यात आलं आहे.
पुणे : तिहार जेलच्या कैद्यांच्या लेखनातील सर्जनशीलतेवर आधारीत चर्चित पुस्तक 'तिनका तिनका तिहाड' आता मराठीत प्रकाशित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ पत्रकार वर्तिका नंदा आणि माजी डीजी (जेल) विमल मेहता यांनी संयुक्तपणे लिहिलेलं, हे पुस्तक लोकप्रिय झालं आहे. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये महाराष्ट्राचे एडीजी (कारागृह) डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केलं.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एडीजी उपाध्याय यांनी म्हटलंय की, 'तिनका तिनका तिहाड' पासून प्रेरीत होवून, येरवडा जेलमधील कैंद्याची सर्जनशीलता कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न आहे. कैद्यांमधील सर्जनशीलतेला उभारी देण्यासाठी 'तिनका-तिनका' फाउंडेशनची मदत घेतली जाईल.
लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये सामील
या पुस्तकाचं हिंदीतून मराठीत भाषांतर मंजरी धामणकर यांनी केलंय, तर पुस्तत मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलंय. या पुस्तकात ४ महिला कैदींच्या कविता देखील सामिल करण्यात आल्या आहेत.
राजकमल प्रकाशित या पुस्तकाला २०१३ मध्ये, तत्कालीन गृहमंत्री यांनी विज्ञान भवनमध्ये रिलीज केलं होतं. तिनका तिनका तिहाड हे थीम गीत २०१५ मध्ये लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये सामील करण्यात आलं.
तिहार जेलच्या कारागृह क्रमांक ६ मधील कैद ४ महिला कैदी रमा चौहान, सीमा रघुवंशी, रिया शर्मा आणि आरती यांच्या कविता यात आहेत. यात विशेष बाब म्हणजे या पुस्तकात कैद्या्च्या फोटोंचा देखील समावेश आहे. या पुस्तकाचं प्रकाशन देखील वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं आहे. पुस्तक उघडल्यावर तुम्हाला फोटोच जास्त दिसतील.
'तिनका तिनका' भारतीय जेल यांच्यावर वर्तिका यांची एक विशेष मालिका आहे. यानुसार गाझियाबादची डासना जेलवर त्यांनी 'तिनका तिनका' डासना पुस्तक लिहिलं आहे. 'तिनका तिनका'च्या माध्यमातून आता वर्तिका नन्दा यांनी आतापर्यंत ३ जेलमध्येचं जेलची गाणी साकारली आहेत. एवढंच नाही त्यांनी देशात पहिल्यांदा तिनका तिनका इंडिया अवार्डस आणि तिनका तिनका बंदिनी अवॉर्डसची सुरूवात केली आहे. मानवाधिकार दिवस तसेच महिला दिवस या दिवशी हे पुरस्कार दिले जातात.