नागपूर: भाजपने कायमच ओबीसी समाजाच्या नेत्यांना संधी आणि पदे दिली. त्यामुळे भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला डावलले जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होत नाही. भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी आणि पदे दिली आहेत. त्यामुळे मी पक्षावर नाराज असल्याचा भ्रम कोणी पसरवू नये, असे बावनकुळे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेत भाजप नेतृत्वावर आगपाखड केली होती. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला डावलले जात आहे का, असा प्रश्न खडसे यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर खडसे यांनी म्हटले की, दुर्दैवाने हे चित्र खरे वाटत आहे. हे पटवून देताना खडसे यांनी प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि संचेती या नेत्यांचा उल्लेख केला. 


अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल


मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावाही फेटाळून लावला. खडसे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र, प्रकाश शेंडगे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपमधील ओबीसींबद्दल बोलूच नये. त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे त्यांना भाजपबद्दल बोलण्याचा काहीच हक्क नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली नाही, याचे शल्य माझ्या मनात नाही. मी पक्षाने सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 


पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून 'भाजप' गायब