चंद्रपूर : ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी चंद्रपुरातही ओबीसी बचाव संघटनेने चंद्रपुरात आंदोलन केले. आंदोलकांनी सर्वपक्षीय आमदारांच्या घरापुढे थाळ्या वाजवून त्यांना मागण्यांची आठवण करुन दिली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. चंद्रपुरात आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगवार यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोलीत खासदार अशोक नेते आणि आमदार डॉ. देवराव होळी यांच्या घरापुढे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन केलं. ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. 


हाच कार्यक्रम स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाला ओबीसी गटात आरक्षण नको ही प्रमुख मागणी कार्यकर्त्यांनी पुढे रेटली. तर ओबीसींची राष्ट्रीय जनगणना तातडीने करा, अशी मागणी करण्यात आली. 


6\