Washim News : विविध मागण्यासांठी कर्मचारी आंदोलन करतात. मात्र, वाशिममध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एका अधिकाऱ्याविरोधात आंदोलन केले आहे.   वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात 3000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन केले आहे. एका अधिाकऱ्याविरोधात झालेल्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. वाघमारे यांची त्वरित बदली करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी 1 ऑक्टोबर पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केलं आहे.  तीन हजार पेक्षाही जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 


वैभव वाघमारे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून असंविधानिक काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना शाळेत विनाईल बोर्ड लावण्यासाठी स्वखर्चातून 50 हजार रुपये पर्यंत रक्कम खर्च करायला लावली, इतकचं नाही तर अत्यंत कमी मानधन असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बोलकी अंगणवाडी सुरु करण्यासाठी लोकवर्गणी करायला जबरदस्ती केली.  कार्यालयात येण्यासाठी उशीर झाला तर वाघमारे कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा अनेक तक्रारी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. 


वाघमारे यांच्या नियमबाह्य  वागणुकीमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.  वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी जोवर बदली होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कर्माचाऱ्यांचा या आंदोलनाचा परिणाम माहापालिकेच्या दैनंदिन कामकाजाावर झाला आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.