औरंगाबाद : बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. याबाबत आता याप्रकरणी लेखी खुलासा देण्याचे आदेश वैजापूरच्या उप विभागीय अधिका-यांनी त्यांना दिलेत.


का असे केले त्यांनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून वैजापूर येथे अधिका-यांनी घोड्याचा आधार घेतला आहे. बोंडअळीमुळे तालुक्यातील ७६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झालयं या नुकसानीचे पंचनामे करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. हे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलिस पाटील यांची पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत. पायी फिरून दहा दिवसात हे काम पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने अधिकाऱ्यानी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करण्याची शक्कल लढवली आहे. 


खुलासा करण्याचे आदेश


दरम्यान, घोड्यावरून बोंडअळ्या पाहणा-या या कर्मचा-यांना त्यांचा शहाणपणा चांगलाच भोवलाय. याप्रकरणी लेखी खुलासा देण्याचे आदेश वैजापूरच्या उप विभागीय अधिका-यांनी त्यांना दिलेत.