नाशिक : नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीला रंग दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबतचा वाद गंगापूर पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिर ट्रस्टवर नव्याने विश्वस्तांची नियुक्ती झाली असून, त्यातच माजी विश्वस्त आणि काही विद्यमान सदस्य यांच्यातील बेबनाव यानिमित्ताने चव्हाट्यावर आलाय.


ट्रस्टच्या माध्यमातून सुधारणा करण्याच्या नावाखाली अध्यक्ष गोरे यांनी परस्पर कामे सुरू केली असून त्यातच त्यांनी शिवपिंडीला चक्क ऑईलपेंट केल्याने वाद सुरू झालाय. 


धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर रंगकाम केल्याचे आढळून आल्याने विश्वस्तांनी परस्पर अशाप्रकारे रंगकाम करून भावना दुखावल्याचा कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.


याविषयी आपली 'झी २४ तास'च्या प्रेक्षकांसमोर आपली बाजू मांडताना मूर्तीचं जतन करणं आमचं काम आहे... धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीचा इथे प्रश्नच येत नाही, असं मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी म्हटलंय.


सोमेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य


- काळ्या पाषाणातील सोमेश्वर मंदिर घारदोन गावचं भूषण


- हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम असलेलं मंदिर


- मंदिराला कलात्मक सभामंडप