तुषार तपासे, झी 24 तास सातारा : काही महिन्यांपूर्वी एसटी चालकाची तब्येत चालू एसटीमध्ये बिघडल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे. एसटी चालवत असताना अचानक चालकाची तब्येत बिघडली. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज येथे पुण्याहून तासगावच्या दिशेने निघालेल्या एसटीमधील चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे एसटीवरील नियंत्रण सुटलं. एसटी थेट उसाच्या शेतात गेली. 


चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटलं आणि उसाच्या शेतातील इलेक्ट्रिक पोलवर धडकली.या बसमध्ये 32 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


भुईंज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. ही घटना साताऱ्याच्या आसपास घडल्याची माहिती मिळाली आहे. एसटी चालकाची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती का? नेमकं काय घडलं याबाबत अजून तरी काहीच माहिती मिळू शकली नाही.