Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात झालीय. विधानभवनात अध्यक्षांसमोरच ठाकरे-शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाली. अपात्रतेप्रकरणी 34 याचिका आहेत आणि सर्व याचिकांवर वेगवेगळी सुनावणी होत असल्यामुळे विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. त्यावर शिंदे गटानं जोरदार आक्षेप घेतला. पहिल्या दिवशीची सुनावणी वादळी ठरली.


कोर्टात नेमका काय युक्तीवाद झाला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

34 याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी असी मागणी ठाकरे गटाने केली. वेगवेगळ्या घटना,मुद्दे असल्याने एकत्र सुनावणी घेणं योग्य नाही असं शिंदे गटाचं म्हणणे आहे.  सर्व याचिकांवर वेगळी सुनावणी घेतल्यामुळे वेळ लागेल असा दावा  ठाकरे गटाने केला. ठाकरे गटानं 3 अर्ज दिले, त्यामुळे विलंब होतोय असं शिंदे गटाचे म्हणणे आहे. शेड्युल 10 चं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करावी अशी मागणीही ठाकरे गटाने केली. शेड्युल 10चा नियम आम्हाला लागू होत नाही असा युक्तीवाद  शिंदे गटाने केला. उलट तपासणी न करता, वेळकाढूपणा न करता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी  ठाकरे गटाने केली. दाखल केलेल्या याचिकांवर प्रत्येक आमदाराला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळावी अशी मागणी शिंदे गटाने केली. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 20 ऑक्टोबरला निर्णय सुनावणार 


दरम्यान याचिका एकत्र करण्यासंबंधीच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 20 ऑक्टोबरला निर्णय सुनावणार आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी निकालाला विलंब लागतोय या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून पहिल्याच दिवशी बोट ठेवलं गेलं. तर ठाकरे गटाच्याच तीन अर्जांमुळे सुनावणीला उशीर होतोय असा पलटवार शिंदे गटानं केलाय. 


शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या याचिकेवर एकाचवेळी सुनावणी


आमदार अपात्रतेबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणाराय.. आमदारांच्या अपात्रतेबाबबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलीय. त्यावर उद्या सकाळी सुनावणी होणाराय. विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा मुद्दा पवार आणि ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टासमोर मांडलाय. या दोन्ही याचिकांवर उद्या एकाचवेळी सुनावणी होणाराय. सुनावणीला लागणारा कालावधी आणि सुनावणीचं भवितव्य याचिकांच्या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरला याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.