मुंबई : नाशिक (Nashik) ऑक्सिजन (Oxigen) गळती दुर्घटनेनंतर महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hushain Hospital) ऑक्सिजनचा पुरवठा (Oxigen Suplly)सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जातायत. दरम्यान आणखी काही रुग्णालयातील ऑक्सिजनसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करुन भविष्यातील दुर्घटना टाळता येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपण्याच्या मार्गावर आहे.. त्यामुळे या रुग्णालयांनी 12 वाजेपर्यंत रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचना देण्यात आल्यात... शहरातील लिक्विड ऑक्सिजनचा तुटवड्याने पुरवठा उशीरानं होत असल्याचं  सांगण्यात आलंय.



साताऱ्यात आता काही तास पुरेल इतकाचं ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय..यावर तोडगा म्हणून दक्ष कराड या संस्थेकडून पोर्टेबल ऑक्सिजन मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र हा पर्याय अल्पकाळासाठी उपयोगी असल्यानं तातडीनं ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची मागणी होतीये. 


केंद्रानं महाराष्ट्राला अधिकाधिक ऑक्सिजनचा साठा द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करुन महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केंद्राकडे केलीय.. यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायला तयार आहे असंही टोपे म्हणालेत.