पुणे : bomb threat call at Pune railway station : आता एक धक्कादायक बातमी.  पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान फिरवत धमकी देणाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, धमकी देणारा हा प्रत्यक्षात निरक्षर आहे. त्याने गूगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. (One arrested for hoax bomb threat call at Pune railway station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय 22,  मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ आणि उच्च पदस्थ पदाधिकारी आणि राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे आणि वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 


धमकीचा कथितपणे कॉल केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. कॉल आल्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच वेटिंग रुम, रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनजवळील सर्व पार्किंग लॉट तपासले गेलेत.


पुणे रेल्वे स्थानकावर 13 मे रोजी स्फोटक सदृश्य वस्तू मिळून आल्याने पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना राबवित आहेत. त्यामध्ये 1 पोलीस निरीक्षक आणि 50 पोलीस अंमलदार हे दररोज बंदोबस्तासाठी स्थानकावर नेमले आहेत.