सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी दोघे हुल्लडबाजी करताना दरीत कोसळले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह आज हाती लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं होती. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचा काम अजूनही सुरू आहे.


हे दोघेही तरूण दारु प्यायल्यानंतर डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते... आणि हेच नसतं साहस या दोघांच्या जीवावर बेतलं. डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुच्या अंमलाखाली असल्यामुळे दोघांनाही काहीच समजत नव्हतं... त्याचवेळी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला... यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.