पुणे :   मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.  


पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालापूर येथील खासगी रूग्णालयात जखमींना तातडीने दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर केणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले


पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक कार वेगाने जात होती. बाकण बोगद्याच्या जवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, कार उलटून पुण्याला जाणाऱ्या लेनवर जाऊन आदळली. 


या अपघातातील कारमधील केणे यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना खालापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.