कोल्हापुरच्या भवानी मंडपात एक महिन्याची बेवारस मुलगी
भवानी मंडप परिसरात मुलीला उघड्यावर सोडून दांपत्य गायब झाले
कोल्हापूर : कोल्हापूरातील भवानी मंडप इथे एक महिन्याच्या मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी सात वाजता भवानी मंडप परिसरात साधारण महिनाभर वय असलेली मुलगी दिसली. भवानी मंडप परिसरात मुलीला उघड्यावर सोडून दांपत्य गायब झाले आहे. बेवारस सोडून गेलेल्या या मुलीला हार विक्रते प्रकाश पाटील आणी पल्लवी पाटील यांनी आसरा दिला आहे. त्यांनी बाळाला घेऊन दूध पाजून तिचा संभाळ केला. पण सतत रडणाऱ्या मुलीला शांत करून मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
यासंदर्भात स्थानिक पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहे. मंदीर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहेत. या मुलीचे पालक का सोडून गेले ? ते कोण होते ? याची चौकशी होत आहे.