नाशिक : जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले होते. मात्र, आता  मनमाड, उमराना आणि मालेगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरु झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड बाजार समितीमध्ये 50 ट्रॅक्टरची आवक झाली होती. कांद्याला सरासरी 1250 रुपये तर जास्तीत जास्त 1360 आणि कमीतकमी 400 रुपये दर होता. तर उमरणा बाजार समितीमध्येही 30 ट्रॅक्टरची आवक झाली होती. कांद्याला 1400 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. तर सरासरी 1200 रुपयांनी व्यापा-यांनी कांदा खरेदी केला.


मालेगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरळीत सुरु होते. मात्र, देवळा आणि कळवण बाजार समितीमध्ये कांदा ठेवायला जागा नसल्यानं व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभाग घेतला नाही. तर नांदगाव, सटाणा आणि नामपूर बाजार समितीमध्ये व्यापा-यांनी पत्र देऊन लिलावा सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानं  लिलाव बंद होते.