कांदा उत्पादकांना जानेवारी २०२१ पर्यंत रास्तभाव मिळत राहणार
कांद्याचे भाव जानेवारी ते फ्रेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतच राहणार आहेत. यापेक्षा उत्पादकांच्या कांद्याला पुढील ३ ते ४ महिने रास्त भाव मिळत राहणार आहे.
नाशिक : कांद्याचे भाव जानेवारी ते फ्रेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतच राहणार आहेत. यापेक्षा उत्पादकांच्या कांद्याला पुढील ३ ते ४ महिने रास्त भाव मिळत राहणार आहे. यामुळेच कांदा उत्पादनासाठी जेवढा खर्च लागतो, तो कांद्याला योग्य भाव मिळाल्याने, कांदा उत्पादकांच्या हातात ४ पैसे येणार आहेत. कारण देशातील काही भागात बेमोसमी पावसासारखा पाऊस अजूनही सुरुच आहे. यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान होत आहे.
सध्या कांद्याचा भाव ४० ते ५० रूपये किलो बाजारात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदीचा भाव हा त्यापेक्षा कमी असतो. दिवाळीपर्यंत बाजारात कांदा १०० रुपये किलो होण्याची शक्यता आहे.
सोमवारी देशातील कांद्याचं सर्वात मोठं मार्केट नाशिक जिल्ह्यातील लासलगावला, कांद्याचा भाव प्रति क्विंटल ६ हजार ८०२ रूपये होता. वर्षभरातला हा सर्वाधिक भाव आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, हा भाव रिटेल मार्केचला येत्या काही दिवसात १०० रुपये किलोपेक्षा जास्त जावू शकतो.
कांदा उत्पादकांना मिळणार योग्य भाव
इंग्रजी दैनिक टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्रातील काही कांदा उत्पादक भागात मोठा पाऊस झाला आहे. यामुळे शेतातील कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे कांदा उप्तादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणार आहे.
कांद्याच्या पिकाचं पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये नुकसान झालं आहे. शेतातील कांदा पिकाला मोठं नुकसान यामुळे झालं आहे. यामुळे कांद्याला रास्तभाव मिळतोय. कांदा पावसाने खराब झाल्याने सप्लाय चेनला फटका बसला आहे. कांद्याचे भरमसाठी पिक येण्यास फेब्रुवारी उजाडणार आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याचे भाव कमी होण्याचे संकेत नाहीत.
मागणी वाढल्याने कांद्याला रास्तभाव
व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे की, कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याला योग्य भाव मिळतोय. अनलॉक ५.० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे सुरु झाल्याने कांद्याची मागणी वाढत आहे. पुरवठा कमी होत असल्याने कांदा कमी मिळतोय. मागणी वाढल्यानंतरही कांद्याची खरेदी सुरुच आहे. पुढील आठवड्यात कांदा ७० रूपये किलोच्या पुढे जावू शकतो.
कर्नाटकात जोरदार पावसाने कांदा पिकाचं नुकसान झाल्याने एका दिवसात कांद्याचा भाव २ हजार रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. एका कांद्याच्या व्यापाऱ्या इनकम टॅक्सचे छापे टाकल्यानंतर, त्याविरोधात व्यापाऱ्यांनी लासलगावचे कांदा मार्केट बंद केलं होतं. सोमवारी मात्र मार्केट उघडल्यानंतर कांद्याचा भाव २ हजार रुपये क्विंटलवर जावून पोहोचला.