नाशिक : उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालल्यानं आणि लाल कांद्याची बाजारातील आवक लांबल्यामुळं कांद्याचा दर चार हजार रुपये क्विंटलवर गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्यानं चार हजारांचा टप्पा पार केला. कांद्याला जास्तीत जास्त 4 हजार 59 रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी भाव 3200 रुपयांचा आहे. तर किमान दर 1 हजार रुपयांपर्यंत मिळालाय.


लासलगावमध्येही अशीच परिस्थीती आहे. लासलगाव बाजार समितीत 3 हजार 800 रूपयांचा भाव मिळाला असून सरासरी दर 3 हजार 200 रूपयांचाच आहे. इतर राज्यांमधील लाल कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दर वाढल्याचं व्यापा-यांचं म्हणणयं. 


इतर राज्यांमधून लाल कांद्याची आवक कमी झाली असून आवक वाढण्यासाठी अजून 15 ते 20 दिवसांचा अवधी असल्याची माहिती व्यापा-यांनी दिलीय. मात्र तोपर्यंत कांद्याच्या दरात तेजी राहणार आहे.