सर्वसामान्यांना कांदा रडवणार, आवक वाढली तरी दर चढेच
Onion Prices : आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. यंदा झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
नाशिक : Onion Prices : आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. यंदा झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने तोडणीला आलेला कांदा खराब झाला. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा पुन्हा रडवणार असेच दिसून येत आहे. कांद्याचे दर चढेच आहेत.
बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली असली तरी पावसामुळे 50 टक्के कांदा खराब झाला आहे. घाऊक बाजारात कांदा दर प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र किरकोळ बाजारात कांदा 40 ते 50 रुपये किलोने विकला जात आहे.
दरम्यान, यावर्षी कांदा उत्पादनावर पावसाचा परिणाम झाल्याने कांद्याचे दर चढेच राहतील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. यामुळे कांदा पुन्हा महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशी चिन्हे दिसून येत आहेत.