योगेश खरे / नाशिक : तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? (Are you currently receiving calls from unknown numbers?) आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा ! कारण सध्या ऑनलाईन दरोडेखोरांचा (Online fraud) सुळसुळाट झाला आहे. तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावेत, असं वाटत असेल तर ही बातमी नक्की पाहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅलो, PF ऑफिसमधून बोलतोय. तुमचा अकाऊण्ट नंबर सांगता का ? हे असे कुठलेही फोन तुम्हाला आले आणि तुमचे अकाऊण्ट नंबर, पिन नंबर विचारलं तर कुठलीही माहिती देऊ नका. कारण तुमच्या आयुष्याची कमाई काही मिनिचटांत लंपास होईल. तुम्हाला फसवून  तुमच्या अकाऊण्टवर डल्ला मारणाऱ्या अनेक टोळ्या सध्या धुडगूस घालत आहेत.


या टोळीतले लोक तुम्हाला फोन करतात आणि तुमचे बँक डिटेल्स, पिन नंबर, वैयक्तिक माहिती विचारत आहेत. या फसवणुकीला अजिबात बळी पडू नका. कोरोनानंतर आता बरेच व्यवहार ऑनलाईनच होत आहेत. याचाच फायदा हे ऑनलाईन दरोडेखोर घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना असे फोन जास्त केले जात आहेत. 


कोणतीही बँक तुमचा कार्ड नंबर विचारत नाही?



कुठलीही बँक फोन करुन तुम्हाला अकाऊण्ट नंबर आणि पिन नंबर विचारत नाही. कुठलीही बँक तुमचा कार्ड नंबर विचारत नाही. त्यामुळे कुणालाही फोनवरुन कार्ड नंबर, पिन नंबर, अकाऊण्ट नंबरची माहिती देऊ नका. उलट तुम्हाला असा फोन आलाच तर पोलिसांना कळवा आणि या ऑनलाईन दरोडेखोरांना अद्दल घडवा. पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड ही तुमची आयुष्यभराची कमाई आहे, ती अशी या दरोडेखोरांच्या हाती देऊ नका.