औरंगाबादच्या ऑनलाईन शस्त्र खरेदीची एटीएस करणार चौकशी
औरंगाबाद तलवार online खरेदी प्रकरणी पोलिसांनी आजही पाच तलवारी जप्त केल्या...online मार्केटिंग पोर्टल वरून पुन्हा 5 तलवारी मागवण्यात आलेल्या होत्या....
औरंगाबाद : औरंगाबाद तलवार online खरेदी प्रकरणी पोलिसांनी आजही पाच तलवारी जप्त केल्या...online मार्केटिंग पोर्टल वरून पुन्हा 5 तलवारी मागवण्यात आलेल्या होत्या....या प्रकरणी ATS ने सुद्धा दखल घेतली आहे...याबाबत चौकशी केली जाणार असून आत्तापर्यंत किती वेळ अशी शस्त्र खरेदी केली याची माहिती घेतली जाणार आहे. दंगली आधी अशी काही शस्त्र खरेदी झाली का? या अनुषंगाने सुद्धा ATS तपास करणार आहे, ही हत्यार कोणी विकत घेतली याबाबतही तपास सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्लिफकार्ट सारख्या ऑनलाईन पोर्टलवरून चक्क तलवारी, चाकू अशा धोकादायक शस्त्रांची विक्री होत असल्याचं समोर आलं होतं. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या सतर्कतेने हा सगळा साठा जप्त करण्यात आला होतातत. कागदामध्ये गुंडाळण्यात आलेल्या या 12 तलवारी, 13 मोठे चाकू, जांबिया, गुप्ती आणि कुकरी.... औरंगाबादमधून हा मोठा शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी शस्त्रं फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग पोर्टवरुन मागवण्यात आली होती. शोभेच्या वस्तू म्हणून तलवार, गुप्ती, जांबिया, अशी धारदार आणि धोकादायक शस्त्र सहजपणे मागवता येतात. याच माध्यमातून शहरात शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.