योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : जिल्ह्यातील धरणात आता केवळ नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणांची परिस्थिती गंभीर झाली असून दहा धरणे शून्य टक्के तर सहा धरणे पाच टक्क्यावर आली आहेत. एकूण नऊ तालुक्यात साडेतीनशेहून अधिक पाणी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय जिल्ह्यात दोन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून पशुधन वाचवण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरलेला नऊ टक्के पाणीसाठा 31 जुलैपर्यंत पुरवायचा असल्याने नाशिक महापालिकेला नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे सुचित केले आहे नागरिकांनीही पाणी वाया घालवू नये म्हणून दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी जिरवणे जावे यासाठी पावसाळी भूजल भूजल पुनर्भरण योजना लागू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.


नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यात भीषण परिस्थिती असून गेल्या आठवडाभरात नव्याने 40 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आदिवासी भागात आजही महिलांना पायपीट करून पाणी घ्यावे लागते.