मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे आंतकवाद संबंध उघड झाले आहेत. पैशांच्या व्यवहाराचा तपास सुरु आहे. मात्र त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोटचेपी भूमिका का घेत आहेत. संजय राठोड आणि नवाब मलिक यात न्यायिक भूमिका कोणाची योग्य हे सीएम साहेब सांगा, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमएलए अतंर्गत अटक असलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मंत्री पदावरून काढावे, अशी मागणी करून शेलार म्हणाले, देशहितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताठ राहावे ही अपेक्षा आहे. शरद पवार यांच्या दबावपोटी त्यांनी बसू नये, झुकेंगे नही असे त्यांनी करून दाखवावे असा टोला शेलार यांनी लगावला.


सीएम यांनी खास मर्जीतील पोलिस आयुक्त नेमले. दाऊद हस्तक संंबधित सगळे गुन्हे दाखल करण्यात यावे. वांद्रे कुर्ला पेपर येथे एक प्राॅपर्टी संबंधित विषय समोर आला. त्यामुळे दाऊदचे हस्तक कोण हे समजू लागले. हिंदुत्व आमचा प्राण, आमचे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण, आमची कातडी त्यांच्यासाठी शाल आहे असे त्याचे वागणे सुरु असल्याची टीका शेलार यांनी केली.


प्राथमिकता कोणासाठी?
नवाब मलिक याना अटक झालाय तेव्हा सगळे मंत्रिमंडळ मंत्रालयासमोर आंदोलन करत होते. पण, संभाजीराजे छत्रपती आझाद मैदान येथे उपोषणाला बसले. त्यांच्या भेटीसाठी कुणी इतकी तत्परता दाखविली नाही. त्यांच्यासाठी वेळ नव्हता. मलिक आणि संभाजीराजे यांच्यापैकी प्राथमिकता कुणाला हे ठरविण्याचे भान सरकारला नाही, अशी टीका त्यांनी केली.  


अपेक्षा फक्त सेनेकडून
उद्धवजी तुमचे बोलणे खूप ऐकले पण आता कृती करण्याची गरज आहे. शरद पवार यांच्या दबावाखाली झुकू नका. बाकीचे दोन पक्ष वाया गेले आहेत. पण, आम्हाला अजूनही फक्त सेनेकडून अपेक्षा आहे असे शेलार म्हणाले.


आदित्य ठाकरे भूमिका स्पष्ट करा 
लावासाबाबत हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे. त्यात केले सत्तेचा दुरूपयोग करण्यात आला. पवार कुटुंबाचा सक्रीय सहभाग आहे. पारदर्शकतेचा अभाव, वैयक्तिक स्वारस, कर्तव्य निभावताना निष्काळजी हे दिसून आले. शरद पवार, अजित पवार आणि सुळे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.