नाणारला रायगडात विरोध, भाजप-शिवसेना वाद पेटणार
कोकणातल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई : कोकणातल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड येथे उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, रायगड इथंही तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केला आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातल्या ४० गावांतील स्थानिकांचा विरोध नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत दिली होती.
मात्र, रायगड या प्रकल्पासाठी भूसंपाद करण्याचा प्रस्तावच उद्योग विभागाच्या विचाराधीन नसल्याचं उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विधान परिषेदेतील लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिलीये.. त्यामुळे आता रायगडमध्येही या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधा आहे का याबाबत शंका निर्माण झाली आहे.